रिक्षा चालकाकडून कारमधील दोघांना मारहाण

0
178

निगडी दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
कारला रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारल्याने रिक्षा चालकांने कारमधील दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे घडली.

आसीफ रहिस खान (वय 29, रा. फातिमा मस्जिद जवळ, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे. अजिंक्य संजय साळुंखे (वय 25, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र साहिल राऊत हे दोघेजण कारमधून भक्ती-शक्ती चौकाकडून त्रिवेणीनगर चौकाच्या दिशेने चालले होते. अंकुश चौक येथे एमएच 12 एसके 0545 या रिक्षाने फिर्यादी यांच्या कारला कट मारला. यामुळे फिर्यादी यांचा मित्र राऊत यांनी रिक्षाचा पाठलाग करून थांबविले. कारला कट का मारला याचा जाब विचारला. यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकाने रिक्षातून लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्यांचा मित्र राऊत या दोघांना मारहाण करून जखमी केले. तर रिक्षा चालक असीफ खान यांनीही कार चालकांच्या विरोधात लोखंडी पाइपने मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.