रिक्षा चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ – बाबा कांबळे

0
467

“रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन” रिक्षा संघटनांच्या बैठकीत निर्णय

पुणे येथे सर्व रिक्षा संघटना, संयुक्त कृती समिती ची बैठक संपन्न

पुणे,दि.११(पीसीबी) – रिक्षा चालक मागण्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, मुक्त रिक्षा परवाना ताबडतोब बंद करून इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट (परवाना) सक्ती करण्यात यावी मेट्रो स्टेशनवर मीटरने व शेअर ए रिक्षा व्यवसाय करण्यासाठी प्रत्येक मेट्रो स्टेशनवर वीस रिक्षांना परवानगी देण्यात यावी, ओला उबर वगैरे या भांडवलदार कंपन्या रिक्षांना भाडे देत नाही चार चाकी वाहतुकीस आर टी ओ ने परवानगी दिलेली नसताना देखील वाहतूक सुरू आहे याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच आग्रीकेटर पॉलिसीचा ड्राप बाबत रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन अग्रीकेटर पॉलिसी अंमलबजावणी करावी, सातत्याने होणाऱ्या ऑनलाईन दंड मुळे रिक्षा चालक हैराण झाले असून रिक्षाचे उत्पन्न रोजचे पाचशे रुपये व दंड मात्र हजारो रुपये कुठून भरायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे ऑनलाइन दंड बाबत नवीन नियमावली तयार करण्यात यावी, करोडो रुपयांचा महसूल शासनाला उपलब्ध करून देणारे पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयास आर सी बुक व लायसन्स छपाई बाबत वगळण्यात आले आहे, हा निर्णय रद्द करून पुणे पिंपरी चिंचवड मध्ये देखील आरसी बुक व लायसन्स प्रिंट करण्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात यावी, मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे पुणे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये रिक्षाची संख्या वाढली आहे परंतु रिक्षा स्टँड मात्र पूर्वीप्रमाणेच आहेत नवीन रिक्षा स्टॅन्डला मान्यता देण्यात यावे, यासह इतर विविध प्रश्नांसाठी, तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय पुणे येथील रिक्षा संघटनांच्या वतीने घेण्यात आला असून याबाबत टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करून हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे सरकारला लवकरात निवेदन सादर करून वरील प्रश्न सोडवण्याचे मागणी करण्यात येणार आहे प्रश्न सोडल्यास पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक-मालकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे माहिती ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली.

पुणे येथील महामाता रमामाई भिमराव आंबेडकर पुतळा स्मारक वाडिया कॉलेज समोर पुणे येथे पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी हा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरातील रिक्षा फेडरेशनचे ज्येष्ठ नेते प्रकाश झाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा* फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, रिक्षा सत्यसेवा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले,भाजपा वाहतूक आघाडीचे अंकुश नवले, माथाडी कामगारांचे नेते श्रीकांत चव्हाण, वाहतूक आघाडीचे आरिफ पठाण, आम आदमी रिक्षा वाहतूक संघटना संस्थापक अजगर बेग,तुषार पवार, यावेळी उपस्थित होते .

-देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री सह परिवार विभाग व इतर विभागांना निवेदन पाठवण्यात येणार असून निवेदनाची दखल न घेतल्यास हळूहळू आंदोलत वाड करण्यात येणार असून लोकशाही मार्गाने कुठल्याही प्रकारचे इजा व कायदा हातात न घेता आत्मक्लेष, उपोषण या मार्गाने आंदोलन करणार असल्याचे आनंद तांबे म्हणाले.

“राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखाली आम्ही नुकतीच दिल्ली येथे जाऊन परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली परंतु यातून कोणताही मार्ग निघाला नाही यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही असे एकनाथ ढोले म्हणाले,

“रिक्षा व्यवसाय वाचण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता आहे रिक्षा चालकांनी देखील यामध्ये सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे रिक्षा चालकांनी एकत्र येऊन सहभागी व्हावे असे अशोक साळेकर, म्हणाले,

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामाता रमामाई पुतळ्यास स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार घालून तसेच “एक होऊ या भावांनो एक होऊया या…. एकीचे हे पाणी सरकारला दाऊया हे चळवळीचे गीत सादर करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, उपाध्यक्ष मुराद काजी, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष गुंड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल शिरसाठ, हिरामण गवारे, निखिल येवले,किरण एरंडे,गफूर भाई,उपाध्यक्ष शाहरुख सय्यद प्रवीण शिखरे सहकार्य अध्यक्ष विल्सन मस्के गणेश शेलार निशान भोंडवे फ्रान्सिस अंतोनी आनंद वायदंडे महादेव गायकवाड अमीर हमजा, भीमा कोरेगाव रिक्षा अध्यक्ष जयकांत फडतरे यांनी सहकार्य केले.