रिक्षा चालकांची इमानदारी…! सापडलेले ६-७ तोळे सोने केले परत

0
595

पिंपरी, दि. ०६ (पीसीबी) – ०५ ऑगस्ट (शनिवार) या दिवशी ऑटो रिक्षा चालक गणेश फुरडे व सुरज तांबे यांना मुकाई चौक येथे एक पांढऱ्या रंगाची बॅग बेवारस बॅग दिसली. त्यामध्ये सोन्याचे 6-7 तोळे दागिने व चांदीचे दागिने होते.

ही बॅग रस्त्यावर मिळून आल्याने सदर रिक्षा चालक यांनी देहूरोड पोलीस स्टेशन डीबी स्टाफ निलेश जाधव यांच्याशी संपर्क करून सदर बॅग देहूरोड पोलीस स्टेशन डी बी स्टाफ कडे आणून दिली.

यावेळी अधिकारी व अंमलदार यांनी सदर बॅग मध्ये असलेल्या चिठ्ठीवरुन सदर बॅगचे मालक अर्चना बारणे (रा. वडगाव शिंदे, तालुका-हवेली) यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क साधला.

यानंतर सदर बॅग मध्ये असलेल्या 6-7 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिन्याबाबत खात्री करून सदर सोने बॅग सह अर्चना बारणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन्ही रिक्षा चालक यांचा देहुरोड पोलीस स्टेशन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.