रिक्षा चालकांचा पाठिंबा भाजप उमेदवार हेमंत रासने यांना, केशव क्षिरसागर यांची घोषणा

0
200

पुणे, दि. २१ (पीसीबी) – बघतोय रिक्षावाला संघटनेतर्फे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये, डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रिक्षाचालकांच्या स्नेह मेळाव्यात, कसबा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंतजी रासने यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. मेळाव्यात मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.

सदर प्रसंगी आमदार सुनील कांबळे, भाजपा उमेदवार हेमंत रासने, संदीप खर्डेकर, बाप्पु मानकर, सचिन वैराट, अल्ताफ शेख, फय्याज मोमीन, संतोष उबाळे, विकास वाघमारे, सोमनाथ म्हस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.