रिक्षा काढायला सांगितली म्हणून कार चालकाला मारहाण

0
430

पिंपरी.दि.23 (पीसीबी)- पार्क केलेली कार काढत असताना समोरच्या रिक्षाला बाजूला काढ सांगितले म्हणून रिक्षा चालकाने कार चालकाला बेदम मारहाण केली आहे. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ शनिवारी (दि.20) सायंकाळी घडली.

याप्रकरणी भु,ण वसंत सातोकर (वय 37 रा. धानोरी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका नोळखी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पार्क केलेली कार काढत असताना त्यांनी समोर उभ्या असेलेल्या रिक्षा चालकाला त्याची रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने रिक्षा चालकाने त्याचे साथीदार बोलावून त्याने कार चालकाला दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच कार चालकाच्या नाकावर मारून नाक फ्रॅक्चर केले.यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.