रिक्षामध्ये दारू पिऊ नका असे म्हटले तेवढ्यात सिमेंटचा गट्टू आणि दारूच्या बाटलीने…..

0
101

दापोडी, दि. 30 (पीसीबी) : रिक्षामध्ये दारू पीत असलेल्या दोघांना दारू पिण्यास मनाई केल्याने दोघांनी मिळून रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजता कासारवाडी येथे घडली.

आजीम गफर बागवान (वय 24, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नासिर चांद शेख (वय 25), रितेश उजागरे (वय 21, दोघे रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बागवान यांनी त्यांची रिक्षा कासारवाडी येथील स्मशानभूमी समोरील रस्त्यावर पार्क केली. काही वेळाने ते रिक्षा जवळ गेले असता रिक्षामध्ये आरोपी दारू पीत बसले होते. आरोपींना रिक्षामध्ये दारू पिऊ नका असे बागवान यांनी सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी बागवान यांना सिमेंटचा गट्टू आणि दारूच्या बाटलीने मारून गंभीर जखमी केले. तसेच परिसरातील नागरिकांना धमकी देत दहशत निर्माण केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.