रिक्षातून महिलेचे सव्वा लाखांचे दागिने चोरीला

0
209
crime

पुणे, दि. २३ (पीसीबी) – रिक्षातून प्रवास करत असताना महिलेचे बॅग मधून सव्वा लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी चाकण रोड ते आळंदी रोड मोशी येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.२२) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात तीन महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , चाकण येथून रिक्षातून जाताना फिर्यादी महिलेच्या बॅगेतून अज्ञात तीन महिलांनी १ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.