रिक्षाचालकांचा आक्रमक पावित्रा; आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन…!

0
173

पिंपरी, दि.१२(पीसीबी)-दुचाकी टॅक्सीच्या विरोधात पुणे शहरात सोमवारी ( ता. १२) पुन्हा रिक्षा बंद करण्यात आली आहे. बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीकडून हा बंद पुकारण्यात आला आहे. बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकांकडून पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात केशव क्षीरसागर म्हणाले की, रॅपिडो बाइक टॅक्सी वाहतुकी विरोधात आम्ही २८ नोव्हेंबर रोजी देखील आंदोलन केले होते. त्यानंतर देखील रॅपिडो कंपनीमार्फत बाइक टॅक्सी वाहतुक सुरू आहे. त्यामुळे आम्ही आज आरटीओ कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहोत, जोपर्यंत रॅपिडो कंपनी बाइक टॅक्सी बंद करीत नाही. तोपर्यंत आमच आंदोलन सुरूच राहणार आहे.आमच्या रिक्षा चालकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ,अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.

दरम्यान, रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी रिक्षा चालकांनी गाणी आणि भजन म्हणत राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई केली नाही असा आरोप संघटनांनी केल्या आहेत.