पिंपरी, दि. ११ – श्रेष्ठ समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
दि.११ रोजी सकाळी ११.३० दरम्यान पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह नरेंद्र पेंडसे, सांगवी गट कार्यवाह राजेश रावत, सामाजिक समरसता मंचाचे सोपान कुलकर्णी, सचिन राऊत, सुधीर कुदळे,शिवचरण लाटा, ज्ञानेश्वर कासार यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते.