रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
17

पिंपरी, दि. १४ –
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
आज सकाळी ७.३० वाजता पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच स्मारक परिसरातील संविधान उद्देशिकेला अभिवादन करून भारतीय संविधानाचे रक्षण करण्याचा निर्धार करण्यात आला.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, हेमंत हरहरे, श्री मार्तंड देवसंस्थान श्रीक्षेत्र जेजुरीचे विश्वस्त अनिल सौंदडे, सामाजिक समरसता गतिविधीचे विलास लांडगे, सोपान कुलकर्णी, सुहास देशपांडे यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते, स्वयंसेवक उपस्थित होते.

समरसता गतिविधीतर्फे पाणपोई, व्याख्यान,वही पेन संकलन उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा.स्व. संघाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान, वही पेन संकलन आदी उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थानी अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता स्व.तात्या बापट स्मृती समिती यांचे वतीने पाणपोईची सोय देखील करण्यात येत असते. कोरोना प्रादुर्भावाचा अपवाद वगळता गेल्या ३० वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू असल्याचे समरसता गतिविधी तसेच समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पाणपोईचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार यांचे हस्ते झाले, अभिवादन स्थळी येणाऱ्या नागरिकांनी या पाणपोईचा लाभ घेत आहेत. ग्रामीण भागातील वंचित मुलांसाठी ‘ एक वही एक पेन ‘ अभियानातंर्गत संकलित १५०० वही पेन भारतीय बौद्धजन विकास समितीला सुपूर्द करण्यात आले यावेळी समितीचे प्रदीप पवार, प्रमोद गायकवाड यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते. शहरातील विविध भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्याख्यान तसेच अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले.