रा.स्व.संघाचे सरकार्यवाह होसबाळे उद्या पिंपरी चिचवड शहरात

0
31

भोसरी, दि. २९ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चऱ्होली नगर (पिंपरी चिंचवड) यांचे वतीने उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदा, रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता संत सावता माळी मंदिर डूडुळगाव येथे वर्षप्रतिपदा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवास प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रयजी होसबाळे संबोधित करणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सतीशजी चोरडिया (अध्यक्ष, आळंदी शहर व्यापारी संघटना) उपस्थित राहणार आहेत, या कार्यक्रमाला परिसरातील स्वयंसेवक, मान्यवर , प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रसिध्दीपत्रात ही माहिती दिली आहे.