राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

0
105

पिंपरी, दि. १३ – शहर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याच्या विरोधात निषेध आंदोलन.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल जी गांधी यांनी केलेल्या विधानाचा व मांडलेल्या विचाराचा मोडतोड करून विपर्यास करून देशांमध्ये चुकीचा संदेश फेक नरेटीव पसरवण्याचे काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने करीत आहे. आणि यावेळी भारतीय जनता पक्षाचा माजी आमदार तरविंदरसिंग मारवा याने जाहीरपणे राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली याबद्दल शहर काँग्रेसने पिंपरी चौकात घेतलेल्या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आपल्या भाषणात आमदार मारवा याचा जाहीर निषेध करून देश विघातक शक्तींनी याआधी महात्मा गांधी इंदिराजी गांधी राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत आणि आता भारतीय जनता पार्टीचा आमदार खुलेआम देशातील विरोधी पक्ष नेते यांना जीवे मारण्याची धमकी देतो आणि केंद्र सरकार त्यावर घोषणा देत निषेध आंदोलन केले.


यावेळी श्रीमती श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, गौतम अरकडे, भाऊसाहेब मुगुटमल, संदेश नवले, किशोर कळसकर, अमर नाणेकर, चंद्रकांत लोंढे, मयुर जयस्वाल, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, गौरव चौधरी, मुन्साफ खान, बाबासाहेब बनसोडे, अर्चना राऊत, निर्मला खैरे, अबूबकर लांडगे, सतिश भोसले, वसंत वावरे, रवींद्र कांबळे, चंद्रशेखर जाधव, राहुल शिंपले, योगेश बहिरट, गौतम ओव्हाळ, दीपक भंडारी, विशाल कसबे, कुंदन कसबे, राजन नायर, जमील औटी, सुरज कोथिंबीरे, आवेज सय्यद, सचिन गायकवाड, सचिन नेटके, संदीप शिंदे, अमरजीतसिंह पोथीवाल, फिरोज तांबोळी, संगम गंगापुरे, आकाश शिंदे, ॲड. प्रथमेश कांबळे, ॲड. अनिकेत रसाळ, हरिष डोळस, युवराज दाखले आदींसह इतर शहर काँग्रेस मधील पदाधिकारी उपस्थित होते.