राहुल गांधींना न्यायालयाचा दणका! सुरत सत्र न्यायालयाने फेटाळली याचिका

0
206

सुरत, दि. २० (पीसीबी) – काँग्रेसने नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण सूरत कोर्टने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती.

या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे राहुल गांधींना तुर्तास खासदारकी मिळणार नाही.

2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. खासदारी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या शिक्षेप्रकरणी सूरत कोर्टात आव्हान दिलं. परंतु, सुरत (Surat) कोर्टाने त्यांची याचिकाच फेटाळून लावली आहे. सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता हायकोर्टात दाद मागणार आहेत.

हे संपूर्ण प्रकरण आहे

23 मार्च रोजी, सुरतच्या CJM न्यायालयाने राहुल गांधी यांनी 2019 मध्ये मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी कलम 504 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती.

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं.

त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.