चिंचवड, दि. ७ (पीसीबी) : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे.राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही. ही उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जाहीर केली आहे.
मात्र आता महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यात निर्माण झाली आहे. शिवसेनेचे नेते राहुल कलाटे हे बंडखोरीच्या तयारीत आहेत.राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके गेले होते. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहे.
तर वंचित बहुजन आघाडी राहुल कलाटे यांना अधिकृत करणार असल्याच्या तयारीला वेग आला आहे. वंचित आणि शिवसेनेची काही दिवसांपूर्वीच युती झाली होती त्यामुळे वंचितच्या आडून शिवसेना ही उमेदवारी देत आहे का अशा चर्चांना आता चिंचवडमध्ये उधान आलं आहे. वंचित आघाडी कलाटे यांना उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ शकतो. मागील काही दिवसांपूर्वी कलाटे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट गाठी झाल्या आहेत.