राहुल कलाटे चिंचवड परिसर काढला पिंजून, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

0
330

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून ते संपूर्ण चिंचवडगाव परिसर पिंजून काढला. नागरिकांसह व्यापारी वर्गाशी संवाद साधला. चिंचवडमध्ये बदल आवश्यक असून आम्ही तुमच्या पाठिशी राहू अशी ग्वाही नागरिकांसह व्यापारी वर्गाने दिली.

चिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या राहुल कलाटे यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. कलाटे यांच्या प्रचारासाठी जनता स्वयस्फुर्तीने रस्त्यावर उतरत असल्याचे दिसत आहे. चिंचवडच्या जनताला आता बदल हवे असल्याने नागरिक उच्चशिक्षित उमेदवार कलाटे यांच्या प्रचार यात्रेत सहभागी होत आहेत. कलाटे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती संभाषणाच्या माध्यमातून नागरिकांना एकविण्यात येते. ही कामे पाहून कलाटे यांच्याकडे व्हिजन असलेला नेता म्हणून पाहत आहे.

चिंचवडमधील पदयात्रेत शेकडो तरुण-तरुणी, महिला , पुरुष सहभागी झाले होते. रंगीबेरंगी शिट्ट्यांचे वाटप करण्यात आले. पदयात्रेची सुरवात कलाटे यांनी मोरया गोसावी यांच्या समाधीच्या दर्शनाने केली. त्यानंतर क्रांतिवीर चापेकर चौक, गांधी पेठ, गावडे भोई आळी, चिंचवडगाव बस थांबा, लिंक रस्ता, तानाजी नगर, काकडे पार्क, शनि मंदिर, राज पार्क, केशव नगर, निंबाळकर आळी या मार्गाने जात नंतर हनुमान चावडी मंदिराच्या जवळ पदयात्रेची सांगता झाली.

या संपूर्ण पदयात्रेत कलाटे यांनी नागरिकांसह व्यापारी वर्गाशी संपर्क साधून सर्वांना विनम्र अभिवादन केले. शिट्टीचे बटण दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन कलाटे यांनी केले. चिंचवडमधील मतदारसंघातील सर्वच भागातील कलाटे यांच्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.