राहत्या घरी गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

0
283

देहूरोड, दि. २८ (पीसीबी) – सासरच्या राहत्या घरी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (वय 26) साईनगर, मामुर्डी येथे घडली. याप्रकरणी पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती मिलिंद महेंद्र कांबळे (वय 35), सासू (दोघे रा. साईनगर, मामुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेश गोपाळ भालेराव (वय 63, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी सोमवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मयत 32 वर्षीय मुलगी आणि मिलिंद यांचा विवाह झाला होता. सन 2015 ते 26 जून 2022 या कालावधीत पती मिलिंद आणि सासूने फिर्यादी यांच्या मुलीला शिवीगाळ, मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.