रासे गावात दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

0
157

खेड, दि. २४ (पीसीबी) : खेड तालुक्यातील रासे गावात चाकण पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारला. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार मंगेश फापाळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने विनापरवाना 75 हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन एका बॅलर मध्ये भरले. बॅलर मध्ये या महिलेने दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी कारवाई केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.