राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या संध्याताई नाखरे यांचे निधन

0
240

पिंपरी, दि. ८(पीसीबी)- राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या संध्याताई सुहास नाखरे (वय 65) यांचे आज रविवारी पहाटे दीर्घ आजाराने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते सुहास तथा राजाभाऊ नाखरे यांच्या त्या पत्नी होत.

संध्याताई नाखरे यांच्या पाठीमागे पती व दोन मुलगे असा परिवार आहे. संध्याताई नाखरे यांनी राष्ट्र सेविका समितीच्या तळेगाव शहर कार्यवाहिका म्हणून अनेक वर्ष जबाबदारी सांभाळली होती. वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठानच्या त्या संचालिका होत्या. खासगी शिकवणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष अध्यापनाचे काम देखील केले होते.

प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपूर्वी संध्याताई यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संध्याताई नाखरे यांच्या पार्थिवावर आज रविवारी सकाळी अकरा वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.