राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संभाजीनगराचा शस्त्र पूजन सोहळा संपन्न

0
381

पिंपरी दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड जिल्हा अंतर्गत देहू गट संभाजीनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचा शस्त्र पूजनाचा कार्यक्रम रामलीला मैदान हॉल जाधववाडी येथे संपन्न झाला.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गलोबल इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. ललित धोका उपस्थित होते. त्यांनी संघाच्या देशहितपर कार्यक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमास बालकांपासून ते वृद्धांपर्यंतच्या समावेश याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रमुख वक्ते गिरीश प्रभुणे यांनी भारत या अखंड प्रदेशाची महती व्यक्त करताना उपनिषदाच्या श्लोकांचा संदर्भ देऊन सत्याचे आचरण असेल. या धर्माने अधर्मावर मात करण्याची शक्ती आराधना करून मिळवली. तर, शस्त्र हाती धरावे लागत नाही. काळाच्या ओघात आता आक्रमणे झाल्याने हिंदुस्थानातील मोठा भाग खंडित झाला, मात्र तरी या देशाची संस्कृती परंपरा विचारधारा श्रेष्ठत्व कसे टिकून आहे. हे विविध उदाहरणांच्या साहाय्याने विशद करून सूर्यासारखे तेज देणारा गावागावात शांती देणारा भारत निर्माण करण्यासाठी खरी वसुधैव कुटुम्बकम पद्धती आपण आणू या. मेकॉलेने केलेले बौद्धिक आक्रमणाची स्वातंत्र्यानंतरही काही प्रमाणात जाणवणारी दाहकता परतवून लावण्यासाठी शस्त्र पूजनाच्या निमित्ताने वाटचाल करूया अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत प्रणाम शस्त्रपूजन व प्रार्थना झाली. यानंतर स्वयंसेवकांनी घोष सामाजिक समता व व्यायामयोग यांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर कार्यवाह निशांत बोरसे तर सूत्रसंचालन डॉ. प्रवीण कोठावदे यांनी केले. आभार प्रदर्शन परमेश्वर यांनी केले. देहू गट कार्यवाह सचिन ढोबळे यांच्यासह संभाजीनगर च्या विविध संघशाखांचे 101 स्वंयसेवक गणवेशात तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.