राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अभ्यासवर्गाचे आयोजन

0
4

पिंपरी दि.९ स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए.) अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे सुरू होणाऱ्या या अभ्यासवर्गात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या सप्टेंबर २०२५ मधील पूर्वपरीक्षेची तयारी केली जाणार आहे. शनिवारी दुपारी ३:०० ते रात्री ९:०० आणि रविवारी सकाळी ७:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत होणाऱ्या या अभ्यासवर्गात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती, एस. एस. बी. प्राथमिक ओळख, व्यक्तिमत्त्व विकास, एकत्रित चर्चा, व्यायाम असे उपक्रम राबविले जातील. सुमारे ३९ वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांसोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले जाते. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारून ग्रंथालय आणि अभ्यासिका उपलब्ध करून दिले जातात. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना अल्प शुल्कात मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे मंडळाचे उद्दिष्ट असून या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे आठ विद्यार्थी यशस्वीपणे एन. डी. ए. मध्ये दाखल झालेले आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी नीता जाधव (९८८१४६६३७२)
किंवा सुजीत गोरे (८६९८६९५२४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी केले आहे.