राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त आयआयएमएस मध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

0
102

यशस्वी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम

पिंपरी, पीसीबी) : दिनांक १२ ऑगस्ट २०२४ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटूयट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे चिंचवड येथील यशस्वी भवन येथे ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी भारतीय ग्रंथालयाचे जनक सी.रंगनाथन यांना आदरांजली वाहून ग्रंथालयांची विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाची भूमिका असते असे सांगितले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करून आपला ज्ञानसंग्रह वाढवून प्रतिभा संपन्न व्हावे असे ही डॉ. शिवाजी मुंढे यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने भेट दिली. यावेळी विविध प्रकारची नवीन नियतकालिके, संदर्भ ग्रंथ, शोधनिबंध याबाबत ग्रंथपाल पवन शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली.