राष्ट्रहित, सामाजिक भान जपणे हाच जीवनाचा पाया!

0
30

– माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मत
– ‘फेस ऑफ इन्स्पिरेशन-२०२४’ पुरस्कारांचे वितरण

चिंचवड, दि. 30 (पीसीबी) : भारत ही छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबाराय यांची भूमि आहे. तुकोबांचे कीर्तन ऐकण्यासाठी शिवराय भंडारा डोंगरावर येत असत. ही शिवरायांची, शूरवीरांची पुण्यभूमी आहे. राष्ट्रहित आणि सामाजिक भान जपणे हा जीवनाचा पाया आहे. पांडुरंग प्रत्येकाच्या मनामनात आहे. लोकसेवा करण्याची प्रेरणा त्याच्याकडूनच मिळते, अशा भावना माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडलचे सर्वेसर्वा प्रा. अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे एक्सप्रेस मीडिया एंटरप्राईझेस, पुणे यांच्या वतीने ‘फेस ऑफ इन्स्पिरेशन-२०२४’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. धर्माधिकारी बोलत होते.

कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, मराठी सिने अभिनेता अंकुश चौधरी, कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक कुमार प्रॉपर्टीज लाईफस्पेस चे व्यवस्थापकीय संचालक अमेय इंद्रकुमार जैन, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मानयवर उपस्थित होते. पद्मश्री गिरीष प्रभुणे म्हणाले की, भारत देश आता अमृत महोत्सवी वाटचाल करीत आहे. गेल्या १० वर्षांत देशाने अनेक क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. या भारत देशाचे नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने भारतमातेची सेवा करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे.

अभिनेता अंकुश चौधरी म्हणाले की, ज्यांच्या कार्यामुळे समाजाला प्रेरणा मिळते. त्यांचा गौरव करण्याची संधी मला मिळाली, ही बाब माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. मुंबईतील नाट्यगृहापेक्षा पिंपरी-चिंचवडमधील नाट्यगृह सुसज्ज आहेत, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. तसेच, प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृहात सादर केलेल्या नाटकांच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.  कार्यक्रमाचे आयोजन एक्सप्रेस मीडिया एंटरप्राईझेसच्या संचालिका व न्यूज एक्सप्रेस मराठीच्या संपादिका मनिषा थोरात-पिसाळ यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. सुमारे आठशे प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अधिकराव दिवे-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे मार्गदर्शक संतोष सौंदणकर यांनी आणि व्यवस्थापन विलास देशमुख यांनी केले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव…
ह.भ.प. श्री.धोंडीबा बाळाजी आल्हाट, शासकीय अधिकारी राजेंद्र पवार,मानसोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय अष्टुरकर, संस्कार प्रतिष्ठान, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, फिजिशियन डॉ.भाग्यश्री लहाणे-मुंडे उद्योजिका वंदना चौव्हाण, ॲड. माधवी बाळपोतदार, ॲड. सारिका परदेशी, लघु उद्योजक संघटनेचे संदीप बेलसरे, फाळके न्युरो हॉस्पिटल, गायकवाड डायबीटीज हॉस्पिटल, वास्तुकला तज्ञ माणिक बुचडे, नेक्सास ग्रुपचे नरेशकुमार पटेल आणि ग्रुप, रिव्हर नेस्टचे दादाराव जाधव आणि नरेश बर्गे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, अभिनेत्री आर्या घारे, एल-एक्सीस सोसायटी, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड कम्पुटर स्टडिज, निसर्ग राजा मैत्र जिवांचे, मेजर उदय जरांडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. मयूर जावळे, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक, प्रीजम सिटी, केंब्रिज इंटरनॅशन स्कूल, अधिरा इंटरनॅशनल स्कूल, गायत्री इंग्लिश मिडिअम स्कूल, गुरूवर्य ॲकॅडमी, विकासभाउ साने सोशल फाउंडेशन आदी मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.