राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टद्वारे ‘वेध भविष्याचा सोसायटी अभियान’

0
138

दि २६ मे (पीसीबी ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टद्वारे ‘वेध भविष्याचा सोसायटी अभियान’ राबवण्यात आले आहे. या अभियानाची माहिती उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी जाणून घेतली.

‘वेध भविष्याचा सोसायटी अभियान’ हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमा अंतर्गत सोसायट्यांमधील तक्रारी आणि समस्या सोडविण्यासाठी मदत होईल. त्यासाठी लवकरच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून एक बैठक घेतली जाईल. त्यातून चांगला मार्ग काढला जाईल, असे अजितदादा पवार यांनी आश्वस्त केले.

राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टच्या वतीने सोसायटीतील समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत ‘वेध भविष्याचा सोसायटी अभियान’ अंतर्गत तयार केलेला अहवाल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टचे मुख्य राज्य समन्वयक योगेंद्र गायकवाड यांनी दिला.