राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी राहुल आहेर निवड

0
428

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – 3 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मुंबई येथे श्री जयंत पाटील व सुनील दादा गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल यांची पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की पिंपरी चिंचवड शहराचा पहिला शिलेदार म्हणून आपली नियुक्ती करण्यात येत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू,फुले, आंबेडकर, व शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळात पर्यंत पोहोचवण्याचे काम कराल अशी आशा व्यक्त केली

यावेळी राहुल आहेर यांनी देखील जयंत पाटील साहेबांना सांगितले की मला एक निष्ठेचे फळ मिळाले आहे म्हणून आपल्या विश्वासाला मी तडा न लावता काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल