राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष पिं. चिं.शहर वर्षा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

0
219

पिंपरी दि. २८ (पीसीबी) -महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष पिं. चिं.शहर वर्षा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिं. चिं.शहर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन संत तुकाराम नगर या ठिकाणी करण्यात आले होते.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला याची गरज असते, अनेक ठिकानी रक्ताचा तुटवड़ा दिसून येतो म्हणून ही गरज लक्षात घेता शिबिराचे आयोजन २६ जुलै रोजी केले होते,शिबिर ९ ते ४ या वेळेत घेण्यात आले. त्यानिमित्ताने प्रत्येक रक्तदात्यास झाडाचे रोप वाटप करण्यात आले.या ठिकानी अनेक तरुण वर्गाणी यामध्ये सहभाग घेतला होता विशेषतः महिला व युवतींनी देखील रक्तदान केले. व शिबिरास उत्तम असा प्रतिसाद मिळाला .

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अजित गव्हाने शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिं.चिं., विलासशेठ लांडे पाटिल माजी आमदार भोसरी विधानसभा, योगेश बहल माजी महापौर,संजोग वाघेरे पाटिल माजी महापौर,भाऊसाहेब भोईर, नाना काटे मा. विरोधी पक्षनेते पिं.चिं.म.न.पा, फजलभाई शेख माजी सभापती शिक्षण मंडळ, विभागीय महिला अध्यक्ष वैशालीताई नागवडे, कविता आल्हाट महिला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिं.चिं.शहर, शीतल हगवने,लोचन शिवले, ज्योती गोफने, मेधा पळशिकर,बबन गाढवे, ज्ञानेश्वर कांबळे,स्वप्निल डोळस,नेहा पडवळ,मेहेक ईनामदार,शुभदा पवार, आदि मान्यवर उपस्थित होते.