राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भोसरी येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

0
334

शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा

भोसरी,दि.२६(पीसीबी) – भोसरी मध्ये काल आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवकशहराध्यक्ष इम्रान शेख यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं.या खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत ८ वर्ष वयोगटात अद्वेत आगरवाल, १० वर्ष वयोगटात आयुष माहुरकर, १२ वर्ष वयोगटात अलौकिक सिन्हा, १४ वर्ष वयोगटात अक्षज पाटिल आणि खुल्या वयोगटात प्रथमेश शेरला यांनी विजेते पदाचा मान मिळविला. तर इतर गटात जेष्ठ नागरिक गटात गिरीश जोशी,महिला गटात कु.नेहा भातखंडे बिगर मानांकन गटात सागर कोल्हे हे विजयी ठरले.

तत्पूर्वी सकाळी ९.१५ वाजता या स्पर्धेचे उदघाटन मा.महापौर श्री. योगेशजी बहल,राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा.श्री. अजित दामोदर गव्हाणे, यांचे हस्ते करण्यात आले, त्या वेळी सौ कविताताई आल्हाट, युवकअध्यक्ष मा. इम्रानभाई शेख,नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे,पंकज भालेकर. इत्यादि मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी शहरअध्यक्ष मा.श्री. अजितभाऊ दामोदर गव्हाणे,मा. महापौर श्री.योगेशजी बहल,नगर सेवक राहुल भोसले आणि शाम लांडे यांच्यात स्पर्धेच्या उदघाटनाचा मैत्रीपूर्ण सामना अतिशय अतितटीने खेळला गेला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले” राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धाचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धा घेत असताना वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी,महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी,या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आणि खऱ्या अर्थाने पवार साहेबांना जो अपेक्षित आहे त्या पद्धतीचा वाढदिवस राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. कारण मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातोय आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचे चांगले उपक्रम घेतले जावेत अशा प्रकारचे अपेक्षा गव्हाणे यांनी व्यक्त केली.

यावेळी श्री.योगेशजी बहल यांनी या खेळाचे शालेय जिवनातील महत्व सांगितले.८०% समाजकारण आणि २०% राजकारण या विचारानुसार युवकअध्यक्ष इम्रान शेख आणि त्यांचे सर्व पदाधिकारी काम करीत असून यापुढेही अश्या प्रकारचे उपक्रम राबविले गेले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्पर्धेत खुल्या गटात २९ गुणांकन ( मानांकन ) प्राप्त व १४वर्ष वयोगटात ६ गुणांकन प्राप्त खेळाडुंसह एकुण १६२ खेळाडुंनी सहभाग नोंदविला.यावेळी विजयी खेळाडूंना चषक रोख पारितोषिक वितरीत करण्यात आली.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रवादी कांग्रेस चे पिंपरी चिचवड शहर अध्यक्ष मा. श्री.अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट व युवक कांग्रेसअध्यक्ष मा.इम्रानभाई शेख,सुरेश जाधव,निर्मला माने यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मोठया प्रमाणावर युवक पदाधिकारी व मान्यवर उपस्थीत होते.स्पर्धेत पंच म्हणुन चिन्मय नाईक,गुरुजितसिंग गुहु, मिलिंद नाईक यांनी पंच म्हणुन काम पाहिले.युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले.