राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा .

0
292

पिंपरी, दि. ६ (पीसीबी)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते पिंपरी चौक येथील स्मारकास पुष्पहार तसेच पक्ष कार्यालयात खराळवाडी, पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पक्षप्रवक्ते विनायक रणसुभे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, खजिनदार दिपक साकोरे, पदवीधर अध्यक्ष माधव पाटील, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, सरचिटणीस किरण नवले, शिवाजी गव्हाणे, योगेश गायवाड, सत्तार शेख, महिला उपाध्यक्ष अर्चना जाधव, सोशल मिडिया चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संजीवणी पुरानिक, विशाल जाधव, विलास वाघमारे, शहर युवक सरचिटणीस दिपक गुप्ता, शत्रुग्न पवार,सरचिटणीस अर्जुन कदम, सुनिल अडागळे, धनाजी तांबे आदि मान्यवर उपस्थित होते.