राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 20 जुलै रोजी पिंपरी चिंचवडमध्ये भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन..

0
161

दि ६ जुलै (पीसीबी ) – शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भव्य विजयी संकल्प मेळावा : शहराध्यक्ष तुषार कामठे

पिंपरी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तब्बल आठ खासदार म्हणजेच महाराष्ट्राचे ‘स्वाभिमानी अष्टप्रधान’ संसदेत दाखल झाले. या सुवर्ण विजयाचे शिल्पकार शरद पवार साहेब आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात येत असून भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे येत्या 20 जुलै रोजी पिंपरी येथे नवमहाराष्ट्र महाविद्यालय प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली, हा विजयी संकल्प मेळावा अत्यंत नेत्रदीपक व यशस्वीरित्या पार पाडण्याच्या नियोजनासाठी आज शहरातील सर्व पदाधिकारी, फ्रंटल तथा सर्व सेल अध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष व पदाधिकारी सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात बैठक पार पडली.

यावेळी आयोजित विजयी संकल्प मेळावा कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली, यावेळी विविध पदाधिकारी मान्यवरांनी आपले मत व संकल्पना व्यक्त केल्या. आदरणीय शरद पवार साहेब लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शहरात जाहीर कार्यक्रमासाठी येत आहेत त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपाने पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील असा विश्वास शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी यावेळी व्यक्त केला.

आयोजित बैठकित नुकत्याच पक्षात दाखल झालेल्या भाजपच्या माजी नगरसेविका प्रियांका बारसे, पिंपरी चिंचवडचे मा. युवक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजितदादा गटातील प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर व पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांचे सर्व पक्ष कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख, महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, उपाध्यक्ष दिलीप पानसरे, विनोद धुमाळ, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, शकुंतला भाट, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष सागर लष्करे, अल्पसंख्याक अध्यक्ष अल्ताफ शेख, ख्रिश्चन सेल अध्यक्ष शॉल कांबळे, व्यापार उद्योग सेल अध्यक्ष विजय पिरंगूटे, विवेक विधाते यांच्यासह प्रचंड संख्यने पदाधिकारी उपस्थित होते.