राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल अध्यक्षपदी ॲड. संजय दातिर-पाटील

0
305

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या अध्यक्षपदी ॲड. संजय भाऊसाहेब दातिर-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल चे प्रदेश अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख यांनी त्यांना आज मुंबई येथे नियुक्तीचे पत्र दिले. ॲड. संजय दातिर-पाटील हे गेली २५ वर्ष वकिली व्यवसायात कार्यरत आहेत.

पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे सन २००६-०७ मध्ये अध्यक्ष असताना त्यांनी मोशी येथे पिंपरी चिंचवड शहरासाठी भव्य न्याय संकुल सुरू होणे कामी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. पिंपरी न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांना आमंत्रित केले होते. पिंपरी न्यायालय बिल्डिंग कमिटीचे ते सदस्य असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नेहरूनगर येथे अद्ययावत फर्निचर व सोयीसुविधांसह ११ कोर्ट हॉल निर्मितीसाठी त्यांनी वकील कमिटी व वकील वर्गासह वेळोवेळी आघाडीवर राहुन पाठपुरावा केला आहे.

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स सोसायटीचे ते सचिव असून सोसायटीचे माध्यमातून वकिलांना हक्काचे घर असावे याकरिता ते शासन दरबारी पाठपुरावा करणार आहेत. पिंपरी चिंचवड बार असोसिएशन चे माध्यमातून वकील वर्गाच्या अडी – अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असतात.महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अतिश लांडगे यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
यावेळी माजी अध्यक्ष ॲड.दिनकर बारणे ,ॲड.सुहास पडवळ,ॲड.गोरक्ष लोखंडे,ॲड.प्रसन्ना लोखंडे,ॲड.दिलीप शिंगोटे उपस्थित होते.