राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संविधान दिन साजरा

0
1

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्या वतीने बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सानिमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे पुष्पहार अर्पण करून तसेच २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन व अभिवादन शहराध्यक्ष, मा.महापौर योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी १०:०० वाजता करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, मा.नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, कार्याध्यक्ष विजय लोखंडे, मा.जितेंद्र ननावरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, प्रदेश सरचिटणीस शोभा पगारे, कामगार सेल अध्यक्ष युवराज पवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगिता कोकणे, मिरा कदम, वैद्यकिय सेल अध्यक्षा मेगाली विटकर, ॲड. राकेश गुरव, अकबर मुल्ला,रमजान सय्यद,बाळासाहेब पिल्लेवार, धनाजी तांबे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते