राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाचा कणा

0
108

कासारवाडी, दि. 21. आज ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून कासारवाडी येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाचा कणा असलेले कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. पक्ष संघटन विषयीच्या त्यांच्या भावना, त्यांचे विचार आणि मतं जाणून घेतली.

पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत, असं यावेळी स्पष्ट केलं. त्यानंतर कासारवाडी मेट्रो स्टेशनला भेट दिली. या भेटीदरम्यान महिला भगिनींनी केलेलं औक्षण मला कामासाठी ऊर्जा देऊन गेला. या प्रसंगी जनसामान्यांनी आपल्या समस्या माझ्यासमोर मांडल्या, त्या आपण प्रशासकीय स्तरावर सोडवू, असं आश्वासन दिलं.