राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) राष्ट्रीय दर्जा काढला

0
107

महाराष्ट्र, दि.२० जुलै (पिसीबी) : देशभरात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

आगामी निवडणुका आणि पक्षांच्या स्थितीत बदल
महाराष्ट्र सोबतच हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या पक्षांना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता. आता, या पक्षांना राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाचे निकष
कोणत्याही पक्षाला प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देताना निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली जाते. १९६८ च्या निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हे निकष निश्चित केले जातात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या संख्येवर आधारित निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) राष्ट्रीय दर्जा काढून राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. हा निर्णय अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.