राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेल अध्यक्षपदी संतोष निसर्गंध..

0
461

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना समारंभपूर्वक नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर झोप़डपट्टी सेल च्या अध्यक्षपदी भोसरी येथील तरुण तडफदार आणि अत्यंत अभ्यासू कार्यकर्ता संतोष शेषराव निसर्गंध यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते निसर्गंध यांना देण्यात आले.