राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत पक्षाला राम राम ठोकल्याचे संकेत

0
30

त्यांनी मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या माधवी खंडाळकर आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे जवळचे संबंध असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

ठोंबरे पाटील यांची फेसबुक पोस्ट काय?
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माधवी मंदार खंडाळकर नामक मी महिलेशी हाताशी धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी पोस्ट केली.

नंतर लाइव्ह करून बनाव व्हिडिओ केला त्यानंतर माधवी व माझी बहीण प्रिया यांनी खडक पो स्टेशन येथे आपापसात मिटविला परत काल दुपारी माझ्या बहिणीवर गुन्हा दाखल केला, माझ्या बहिणीसुद्धा माधवी खंडाळकरसह दोघांनावर गुन्हा दाखल केला आहे. माधवी खंडाळकर विषय संपला, कायदेशीर कारवाई सुरू झाली. असा इशारा देत चाकण यांच्यावर त्यांनी तोफ डागली आहे.

आता राज्याच्या महिला अध्यक्षा यांनी फलटण मधील dr.संपदा आत्महत्या प्रकरणी पदावर असून पीडिताचे चारित्र्य हनन केले त्याचे उतर महाराष्ट्राला द्यावे. अशी मागणी करत महिलांचे रक्षण,सुरक्षा,सक्षम करण्याचे सोडून पदावर असताना गैरवापर करून महिलांची बदनामी,शोषण केले. असा आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच, नैतिक जबाबदारी स्वीकारून महिला राज्य आयोगाचा राजीनामा द्यावा.आता राज्य महिला आयोगाच्या विरोधात लढाई सुरू. मी लढणारी,लढावू कार्यकर्ता आहे. अस त्यांनी म्हटले आहे.

पक्षाला ठोकला राम राम?
विशेष बाब म्हणजे ठोंबरे पाटील यांनी यावेळी अँड.रूपालीताई पाटील ठोंबरे
मा.नगरसेविका अध्यक्ष -झाशीची राणी प्रतिष्ठान. असे पोस्टच्या खाली स्वतःची माहिती दिली आहे.

त्यांनी पोस्टमध्ये पक्षाच्या नावाचा लोगोचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

काल केली होती राजीनाम्याची भाषा

रूपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह चार जणांविरुद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माधवी खंडाळकर यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेल्या असता ठोंबरे पाटील यांनी पोलीस वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडला. यावेळी त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते. पुढच्या 1 मिनिटात ट्विट करुन राजीनामा देते असंही त्या म्हणाल्या आहेत. राजीनामा दिल्यानंतर पोलीस आणि हे सरकार कसं काम करतं हे सगळ्यांच्या समोर आणणार असा इशारा दिला.