राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल बरखास्त

0
223
Mumbai: All India Football Federation (AIFF) President Praful Patel during AIFF’s Executive Committee Meeting, in Mumbai on July 22, 2018. (Photo: IANS)

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग तसंच सेल बरखास्त करण्यात आले आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वगळता राष्ट्रवादीचे सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त केले आहेत, असे ट्विट राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्यात कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विविध निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल पटेल यांची सही असलेल्या पत्रात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.