राष्ट्रवादी काँग्रेसची ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सना मलिक-शेख आणि झिशान सिद्दीकी हे दोन तरुण मुस्लिम चेहरे…

0
47

मुंबई, दि. 25 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेले उमेदवार खालीलप्रमाणे :

अणुशक्तीनगर – सना मलिक – शेख
इस्लामपूर – निशिकांत पाटील
तासगाव – कवठेमहांकाळ – संजयकाका पाटील
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
वडगाव शेरी – सुनिल टिंगरे
शिरूर – ज्ञानेश्वर कटके
लोहा – प्रताप पाटील – चिखलीकर आदींचा समावेश आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पुजा पवार आदी उपस्थित होते.