राष्ट्रवादीतील ‘मुन्नी’ कोण, हा प्रश्न विचार त्यांनाच विचारा

0
7

पुणे, दि. 9 (पीसीबी) : सुरेश धसांनी आरोप केलेली राष्ट्रवादीतील ‘मुन्नी’ कोण असा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले. ज्यांनी हा मुद्दा काढलाय त्यांनाच विचारा असं सांगत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. अमोल मिटकरींनी सुरेश धसांवर आरोप केल्यानंतर धसांनी राष्ट्रवादीतील मुन्नीची सुन्नी करणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी यावर भाष्य केलं. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलंय. त्यामुळे पक्ष वगैरे न पाहता कोणताही वरिष्ठ नेता यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

राष्ट्रवादीतील मुन्नी कोण?
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड प्रकरणात धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले. अजित पवारांवरही त्यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप केले. धस यांनीच जमिनी लाटल्या, खंडणी गोळा केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. त्याचसोबत राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनीही सुरेश धस यांच्यावर आरोप केला होता.

मिटकरींच्या आरोपावर सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं. मिटकरी किंवा सूरज चव्हाण हे लहाण मासे आहेत. त्यांना राष्ट्रवादीतील एक मुन्नी आरोप करायला सांगत आहे. त्या मुन्नीची मी सून्नी करणार असं धस यांनी म्हटलं होतं.

सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीतील मु्न्नी कोण असं अजित पवारांना विचारल्यानंतर ते चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय त्यांनाच विचारा असंही ते म्हणाले.