राष्ट्रवादीतर्फे आयोजित ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिसाद

0
237

पिंपरी दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यावरण सेल आणि चिंचवड पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या सोयीसाठी आयोजित केलेल्या ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ या दोन दिवसीय शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पूर्णानगर येथे झालेल्या शिबिराचे महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे ,पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष विनय शिंदे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. हरिनारायण शेळके, कल्याण वाणी, श्रीनिवास लोढा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा अंजुषा नेर्लेकर, सांगवी पिंपळेगुरव प्रभाग अध्यक्ष जावेद शेख, वसंत अवसरीकर, भरत मालवी, सुभाष आहेर, विक्रम गोते, राहुल बडगुजर, माऊली शेळके, रोहित चव्हाण, अदित गुजरे, संदीप आल्हाट, सविता राणे, रंजना आहेर, कल्पना घोडे, मंदा भोंडवे, कुसुम उदार, सोनाली गोते, कृणाली बडगुजर, जया गायकवाड, निवेदिता कदम, प्रिया झोपे, स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्ष अर्चना तौंडकर उपस्थित होत्या.

माजी नगरसेवक नारायण बहिरवडे म्हणाले की, नागरिकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता नेहमीच तत्पर असतो. तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही नेहमीच करत असतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती जाधव यांनी केले. विनय शिंदे यांनी आभार मानले.