राष्ट्रवादीच्या नवीन पक्ष कार्यालयात शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

0
240

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – तुषार कामठे यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यावर धडाडीने काम करण्यास सुरवात केली. पिंपरी चौकात 2100 स्के. फुटाचे ऑफिस घेतले.आज या नूतन राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोश आणि उल्हास दिसत होता. यावेळी सरचिटणीस शकुंतला भाट म्हणाल्या की साहेबांच्या महिला धोरणामुळे मी सभागृहात जाऊ शकले तसेच हजारो महिला सरपंच आणि महापौर होऊ शकल्या. मुख्य प्रवक्ते माधव पाटील म्हणाले यांनी ‘ शरद नॉलेज हब ‘ लायब्ररी याची संकल्पना मांडली आणि 12 पुस्तके कार्यकर्त्यांना सुपूर्द करून या लायब्ररीसाठी दिली. 12 पुस्तकातून सुरु झालेली ही लायब्ररी शहरातील सर्वात मोठी लायब्ररी असेल असा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी यावेळेस केला.

शहर उपाध्यक्ष दिलीप पानसरे म्हणाले की साहेबांनी फळबागांसाठी योजना आणून शेतकऱ्यांना साथ दिली. यावेळी
युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, सरचिटणीस अशोक तनपुरे,सेवादलचे शहराध्यक्ष अरुण थोपटे,उपाध्यक्ष अनिल भोसले, अल्प संख्यांक अध्यक्ष अल्ताफ शेख,उपाध्यक्ष डॉ.काशिनाथ बामणे,संघटक राजू खंडागळे आणि विवेक विधाते, ख्रिश्चन सेल अध्यक्ष शौल कांबळे, ओबीसी चे भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष माळी,नेते काशिनाथ जगताप राजेश हरगुडे,संपतराव पाचुंदकर,अरुण झुंझारराव,अण्णा पाखरे,डी बी धनगर,ए इ माने, दिनेश अडकिने,गुणवंत पाटील,मुन्नाभाई मुल्ला, समीर शेख, आजम अजीज,विजयकुमार अब्बड, अविनाश कांबळे,सुयश भोसले, अर्जुन कदम, हेमंत बलकवडे,पंकज चव्हाण,रंजना फ्रान्सिस,वैशाली निडगुळे, सार्थक बराटे आदी उपस्तिथ होते.