राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे आमने-सामने; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

0
268

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे निवडणूक कार्यालयात आमने-सामने आले होते. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना उचलून घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीवेळा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे ग प्रभाग कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार हेही त्यांच्यासोबत होते. त्याचवेळी बंडखोरी केलेले राहुल कलाटे आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत होते. दोघेही आमने-सामने आले. त्यावेळी काटे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तर कलाटे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलून घेतले. त्यावेळी दोनही बाजुंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.