राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची गाडी फोडली

0
75

अकोला, दि. ३० जुलै (पीसीबी) – राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ‘सुपारीबाज नेते’ संबोधल्याने आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर मिटकरी आले असताना चिडलेल्या मनसैनिकांनी मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. हल्ल्यानंतर मिटकरीही आक्रमक झाले असून जोपर्यंत मनसैनिकांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे सांगत पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणातून पाणी वाहिले, अशा शब्दांत डिवचले. त्यावर संतापलेल्या अमोल मिटकरी यांनी राज यांच्यावर तोफ डागली होती. राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा करीत टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबाजांनी अजित पवारांवर बोलू नये, असा पलटवार केला होता. मिटकरी यांच्या टीकेनंतर मनसैनिक कमालीचे आक्रमक झाले.