राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे उमेदवार ,.

0
450

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विधान परिषद निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. विविध पक्षाचे नेते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीच्या इच्छेने धाव घेत आहेत. भेटीगाठी वाढल्या असून सगळ्यांनी मुंबईत ठाण मांडलंय. आता कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

आतापर्यंत भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केलीय. श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांच्यासह प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे यांना संधी मिळाली आहे. आज सहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे राज्यसभेसारखी परिस्थिती विधानपरिषदेवेळी असणार हे स्पष्ट झालं आहे.
शिवसेना आणि काँग्रेसनेही प्रत्येकी दोघांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. शरद पवार मुंबईतून पुण्यात दाखल झाले. त्यामुळे सस्पेन्स वाढला. मात्र राष्ट्रवादीनेही दोन नावांची घोषणा केली आहे. प्रदेशाध्य
राष्ट्रवादीच्या गोटातून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट घेतली. यानंतर दोघांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीला हिरवा सिग्नल मिळाला आहे.
रामराजे निंबाळकर सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. तर एकनाथ खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी पाठवण्यात आलं होतं. पण अजूनही राज्यपालांनी त्यांना मान्यता दिली नसल्याने आता विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागणार आहे.