राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा शिवसेनेचा निर्णय

0
292

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मातोश्रीवरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदारांची मत समजून घेत उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाआघाडीतून अलगद बाहेर पडण्यासाठी शिवसेनेचे हे पहिले पाऊल असल्याचे मानले जाते.

भाजप आणि शिवसेना यांचे संबंध ताणले गेले असताना शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. मुर्मू या महिला आहेत व आदिवासी समाजाच्या आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असे स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केले.यासंदर्भात मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी घेतला आहे. अशी माहिती दिली.

द्रोपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिली आहेत. त्यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणार अधिक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. बैठकी दरम्यान प्रत्येकाची मतं समजून घेतली. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे नाही.
यशवंत सिन्हा तेही विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनाही आमच्या सद् भावना आहेत. कारण देशामध्ये एकी पाहिजे. हे जरी खर असल तरी अनेकदा अशा निवडणुकासंदर्भात एक लोक भावना काय आहेत. ते पाहून हा निर्णय घ्यावा लागतो, असे राऊत म्हणाले.