रावेत येथील 27 कोटी फसवणूक प्रकरणी एकास अटक

0
424

रावेत, दि.५ (पीसीबी) – बांधकाम व्यवसायात एका व्यावसायिकाची 27.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यातील एका आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सुनीलकुमार विनोदभाई पटेल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नंदकुमार भालचंद्र भोंडवे यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनीलकुमार याच्यासह दिनेशभाई प्रेमजीभाई पटेल, ललितकुमार नुनवाला आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, अॅड. ललितकुमार झुनझुनवाला यांनी नोंव्हे 2020 रोजी ठरलेल्या चर्चेनुसार पोलाईट बिल्डटेकच्या भागीदारांना निवृत्ती पोटी 30 कोटी देण्याचे ठरले होते. त्याबाबतचा दस्त निवृत्त भागीदारंनी सही करुन अॅड. ललित झुनझुनवाला यांच्याकडे दिला होता, सदरचा दस्त फिर्यादींना न देता 12 सप्टेंबर 2022 रोजी फिर्यादी यांना भागीदारी निवृत्तीच्या दस्तावर सहया करण्यास आरोपींनी भाग पाडले.

हा दस्त अॅड. ललित झुनझुनवाला यांनी अद्यापपर्यंत फिर्यादी यांना दिला नाही. तसेच पोलाईट बिल्डटेकचे भागीदार दिनेशभाई प्रेमजीभाई पटेल व सुनीलकुमार विनोदभाई पटेल यांनी इतर साथीदारांसोबत संगणमत करुन बनावट बिले सादर करुन त्याचा वापर करुन पोलाईट बिल्डटेक 40 या खात्यातून एकुण रक्कम 27.12 कोटी रुपयाचा अपहार करुन फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेने सुनीलकुमार यास अटक केली आहे. आरोपीला 2 मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.