रावेत मध्ये एटीएम फोडून रोकड पळवण्याचा प्रयत्न

0
111

दि. ३१ जुलै (पीसीबी) रावेत,
रावेत येथे चोरट्याने एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून रोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आली.

एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक नीतू शिवणकर यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत मधील भूमी सिद्धी सोसायटी सेक्टर 32 अ येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. सोमवारी रात्री अकरा ते मंगळवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने एटीएम सेंटर मध्ये प्रवेश करून कॅश डोअरचे लॉक तोडले. त्यानंतर एटीएमचा दरवाजा तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.