रावेत आणि निगडी मधून दोन पिस्तूल जप्त

0
56

निगडी, दि. 4 (पीसीबी)

रावेत आणि निगडी येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

रावेत पोलिसांनी नरेश दलबहादुर बि क जनाला (वय 20, रा. रावेत) याला अटक केली. नरेश याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. रविवारी (दि. 3) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आकुर्डी देहूरोड रेल्वे ट्रॅक जवळ रावेत येथे ही कारवाई करण्यात आली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

निगडी पोलिसांनी रितेश पोपट सोनवणे (वय 18, रा. ओटास्कीम, निगडी) याला निगडी स्मशानभूमी जवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा आणि पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.