राम जन्मभुमी सोहळ्यानिमित्त इंद्रायणीनगरच्या श्री राम मंदिरातह भजन-किर्तन, महाप्रसाद, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांचे संयोजन

0
213

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – अयोध्या येथील राम जन्मभुमी मंदिरातील रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशभरात मोठा दिवाळी साजरी होणार आहे. भोसरीच्या इंद्रायणीनगर येथील राम मंदिरात त्यानिमित्ताने अगदी पहाटे पाचपासून अभिषेक, आरती, यज्ञ, भजन-किर्तन, प्राणप्रतिष्ठा, सुंदरकांड आणि महाप्रसाद असा दिवसभराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महपालाका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे आणि बांधकाम व असंघटित कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष सारंग कामतेकर यांनी संयोजन केले आहे.

२२ जानेवारीला अयोध्या येथील भव्यदिव्य अशा मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत होणार आहे. या निमित्त संपूर्ण देशात अगदी गाव खेड्यातसुध्दा भजन-किर्तन, महायज्ञ, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर परिसरातील साडेतीन हजार मंदिरांतून दीपोत्सव तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरी येथील इंद्रायणीनगर सेक्टर सात मधील श्रीराम मंदिरातही अशाच पध्दतीने दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे पाच वाजता अभिषेक, सात वाजता आरती, नऊ वाजता महायज्ञ, सकाळी १० ते दुपारी १२ भजन – किर्तन होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपणाची सोय या मंदिरात करण्यात आली आहे. दुपारी चार वाजता सुंदरकांड, नंतर सायंकाळी सात वाजता दीपयज्ञ आणि रात्री आठ वाजता महाप्रसाद होणार आहे. इंद्रायणीनगर येथील भाविकभक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.