परकीय बाबर व मीर बाकी सारख्या हिंदूद्वेष्ट्या आक्रमक ईस्लामी जिहादी मुसलमानांनी हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर तोडून त्याजागी मशीद बांधली!. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर, लाखों हिंदूंच्या बलिदानानंतर, अगदी लोकशाही मार्गाने न्यायिक लढा देऊन हिंदूंनी त्या जागी राम जन्मभूमी मंदिर पुन्हा मोठ्या उत्साहाने बांधले! ही जगातील अलौकिक व ऐतिहासिक घटना आहे!
अशा विजिगिषू वृत्तीची प्रेरणा मिळावी, रामरायाचे व विठूरायाचे ऐक्य आपल्या घोषवाक्यातून दिसावे, असे आय टी दिंडी च्या वारकऱ्यांना वाटते. वारीतील स्नेहभाव, ऐक्यभाव, समरसतेची दिव्य अनुभूती दृढ व्हावी!! वारी हे आपल्या संतांनी दिलेले व छ. शिवाजी महाराजांसारख्या वीरांनी रक्षिलेले पवित्र साधन आहे!! ते वारकऱ्यांच्या भक्तीने भरलेले व धारकऱ्यांच्या शौर्याने तेजस्वी झाले आहे!! त्यासाठी, ‘राम मंदिरी, विठू पंढरी’ असं घोषवाक्य आय टी दिंडी च्या वारकऱ्यांच्या टोप्यांवर दिसेल.