रामनवमी मिरवणुकीत डिजेच्या आवाजाने महिलेचा मृत्यू

0
1

पुण्यातील हडपसर (साने गुरुजी नगर) येथे रामनवमीच्या मिरवणुकीत डिजेच्या अतिउच्च आवाजामुळे ६५ वर्षीय रंजना रवींद्र जाधव या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ही घटना काल रात्री ( २७ मार्च) रोजी घडली. मिरवणुकीतील गोंगाटात मदतीची हाक न ऐकू आल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने हा जीवघेणा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
साने गुरुजी नगर, हडपसर येथे ही घटना घडली. डिजेचा अतिउच्च आवाजानेच मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. रंजना जाधव या रामनवमी मिरवणूक पाहत होत्या, त्यावेळी डिजेच्या आवाजामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी आरोप फेटाळले असून, महिलेला बायपास सर्जरी आणि डायलिसिसचा पूर्वइतिहास होता, असे सांगितले आहे.
मिरवणुकीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला, असेही सांगण्यात आले.