रामनवमीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

0
246

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- रामनवमीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 50 हजारांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले ही घटना गुरुवारी दिनांक 30 दुपारी साडेबारा वाजता श्रीकृष्ण नगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रामनवमीनिमित्त कीर्तन ऐकण्यासाठी गेल्या होत्या. कीर्तन संपल्यानंतर राम जन्मोत्सवासाठी ठेवण्यात आलेल्या पाळण्याचे दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण मंगळसूत्र चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.